पन्नास हजारासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार

चाळीसगाव  : बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी आई-वडीलांकडून ५० हजार रुपये घेऊन ये सांगत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक प्रकार तालुक्यातील ओझर येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पतीसह सासरच्या विरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील ओझर येथील २२ वर्षीय विवाहितेचा लग्न  गावातील सचिन सुरेश जाधव यांच्याशी २५ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला. विवाहितेला सासरच्यांनी सुरूवातीचे तीन महिने चांगली वागणूक दिली. मात्र २७ मे २०१८ नंतर बांधकामासाठी लागणाऱ्या प्लेटी व वस्तू खरेदी करण्यासाठी आईवडीलांकडून ५० हजारांचा तगादा लावून धरत शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली. आई– वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने सदर विवाहितेने नकार दिला.

दागिने काढून काढले घराबाहेर

लग्नात आई– वडिलांनी दिलेले ५ तोळे सोन्याची पोत व चांदीचे दागिने विवाहितेच्या अंगावरून काढून ४ सप्टेंबर २०२० रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास सासरच्यांनी घराबाहेर काढले. त्यानंतर माहेरी असताना विवाहितेला त्रास देण्यात आला. या प्रकरणी पिडीत महिलांनी महिला दक्षता समिती जळगाव यांच्याकडे तक्रार केली. परंतु त्याठिकाणी सासरच्यांनी हजेरी लावली नाही. म्हणून पिडीतांनी दक्षता समितीकडून मिळालेल्या पत्राच्या आधारे पती सचिन सुरेश जाधव, सासरे सुरेश सुखदेव जाधव, सासु संगिता सुरेश जाधव व दिर नितीन सुरेश जाधव यांच्याविरुद्ध १ जून रोजी दुपारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e