धुळे : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी राजा शेतीच्या मशागतीच्या लगबगीमध्ये गुंतलेला आहे. अशात बोगस बियाणे विकणाऱ्या एकाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस बियाणांच्या जवळपास अकरा पाकीटांसह ताब्यात घेतले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी बियाणे व खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. अशा परिस्थितीमध्ये बोगस बियाणे व खत विकणाऱ्या टोळी देखील सक्रिय होत असतात. या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे या बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर नियंत्रण विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकामार्फत जिल्ह्यातील पहिली कारवाई शिरपूर येथे करण्यात आली आहे.
चौदा हजाराचे बोगस बियाणे
अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या बोगस बियाणांच्या कंपनीवर तसेच ती बियांणे विकणाऱ्यावर शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांकडून जवळपास 13 हजार 750 रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहेत.
0 Comments