रामबापूचा दुसरा कारनामा
ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने रामबापू बागूल व नीलेश हरळ याच्याविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केल्यानंतर शहरातील बिसलेरी बॉटलचे होलसेल विक्रेते हेमंतकुमार सुभाष पाटील (वय ३८) यांनी अवैध सावकार गणेश ऊर्फ रामबापू बागूल, नीलेश हरळ याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला. तक्रारदार पाटील यांनी या संशयित दोघांकडून एकूण साडेसात लाखाचे रोख कर्ज सरासरी सहा ते दहा टक्के व्याजाने घेतले. त्यासाठी कोरे धनादेश दिले. त्यानुसार पाटील यांनी वेगवेगळ्या स्वरूपात या सावकारांना आतापर्यंत १८ लाख रुपये व्याजापोटी अदा केले. तरीही नऊ मेस रामबापू व हरळ याने पाटील यांच्या घरी जात व्याज व मुद्दल रक्कमेचा मोबदला मागितला आणि कोऱ्या धनादेशाच्या मोबदल्यात ५० हजाराची खंडणी मागितली. अन्यथा, पाटील यांचे हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे पाटील यांनी बँक खात्यातून फोन पेव्दारे ५० हजाराची रक्कम या सावकारांना दिली. यात या सावकारांनी रामेश्वर बापू चौधरी यांच्याकडूनही पाटील यांना पैसे आणून दिल्याचे सांगितले, असे फिर्यादीत नमूद आहे.
0 Comments