जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मौजे कुढावद ते भुतेआकसपूर रस्त्यावरील फरशी पूल दुरुस्त करण्याबाबतची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. शहादा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी लिंबर्डी, सातपिंपरी, नवलपुर, अंबाबारी, कुढावद ते भुतेआकसपूर अशा पाच ते सात गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील फरशी पूल तुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस लिंबर्डीपर्यंत पोहोचत नसल्याने पाच गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच रात्रीच्यावेळी फरशी पुलावर मोठे वाहन गेल्यास मोठा अपघात होऊन आर्थिक व जीवित हानी होण्याची शक्यता असल्याने पाच गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर पूल व रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
0 Comments