खेडेगावात राहणारे हे दाम्पत्य जन्मापासून मुकबधिर आहे. उन्हाळा असल्यामुळे दाम्पत्य घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री रोहित अरविंद पाटील हा तरुण छतावर आला. त्याने मुकबधीर असलेल्या या विवाहितेचे तोंड दाबून विनयभंग केला. काही वेळाने तरुण पळून गेला होता. यानंतर विवाहितेने आपल्यावर झालेला अत्याचार पतीस इशारे करुन सांगितला.
सकाळी हे दाम्पत्य पोलिस ठाण्यात गेले. बोलता येत नसल्यामुळे हा प्रकार कोणी केला? याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. अखेर गावातील काही तरुणांच्या मोबाइलमधून तिला फोटो दाखवण्यात आले. यात तिने रोहित पाटील याचा फोटो पाहून त्यानेच विनयभंग केल्याचा इशारा दिला. त्यानुसार पारोळा पोलिस ठाण्यात रोहित पाटील याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, दुसरीकडे एका अल्पवयीन मुलीसह एका मुलाचाही विनयभंग करण्यात आला आहे. एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका दाम्पत्याने परिसरातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीसह मुलाचा विनयभंग केला. मंगळवारी दुपारी शहरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. या दिलेल्या फिर्यादीवरुन रणजीत जिजाबराव इंगळे व त्याच्या पत्नी रंजना या दोघांच्या विरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments