आरोपीविरुद्ध बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील साई दर्शन कॉलनीत ही घटना घडली आहे. चितोड रोड परिसरातील श्रीराम नगरातील प्रशांत सूर्यवंशी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील साई दर्शन कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका युवतीची इंस्टाग्रामवर त्याच भागातील श्रीराम नगर भागात राहणारा प्रशांत सूर्यवंशी याच्याशी मैत्री झाली.
यानंतर अनेक दिवस दोघांमध्ये इंस्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवर मैत्री अधिक घट्ट झाली. त्यानंतर या ओळखीचा प्रशांत याने गैरफायदा घेत काल दुपारच्या सुमारास घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित युवतीचे आई - वडील हॉस्पिटलच्या कामानिमित्त बाहेर गेले असतांना प्रशांतने संधी साधून घरात प्रवेश केला आणि त्यानंतर ही घटना घडली. या संदर्भात पीडित युवतीने धुळे शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे.
0 Comments