सागवान लाकूड जप्‍त; नवापूर तालुक्‍यात वनविभागाची कारवाई

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बोरविहीर व काळंबा येथे वन विभागाच्या कारवाईत मारुती कारसह सागाचे 64 नग जप्‍त केले. साधारण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई वन विभागाने केली आहे
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मौजे बोरविहीर, बारी, काळंबा या गावातील गुमान गावित, कुष्या गावित, दिलीप गावित व सुभाष गावित यांच्या घराची वनविभागाच्या पथकाने सर्च वारंटने झडती घेतली. त्यात 53 साग चौपट नग मिळाले. तसेच बारी गाव महसूल शिवारात एका झोपडीजवळ मारुती कार (क्र. जीजे. 19, A 1448) या वाहनांची तपासणी केली असता त्यात 11 नग चौपट मिळून आले. सदरचे वाहन व शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले असून सदरच्या कारवाईत सागाचे चौपाट एकूण 64 नग व मारुती सुझुकी वाहन जमा करण्यात आले असून सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजे किंमत अडीच ते तीन लक्ष रुपये असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई दिनांक 5 मे 2022 रोजी पहाटे प्रादेशिक सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल नवापूर स्नेहल अवसरमल, वनपाल दराडे, वनरक्षक कमलेश वसावे, लक्ष्मण पवार, चालक एस. एस. तुंगार, दिलीप गुरव, बाळकृष्ण गावीत, अनिल गावित, दिनेश गावित यांच्या पथकाने केली आहे. सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार शहादा यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात आले आहे की वन्य व वन्यजीव तसेच अवैध लाकूड संबंधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e