चाळीसगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीला शाळेतून परतताना पाठलाग करून तन्वीर शेख शब्बीर हा नेहमी त्रास देत होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे तुही माझ्यावर प्रेम कर अन्यथा पळवून नेईल; अशी धमकी गत दोन महिन्यांपासून तन्वीर शेख शब्बीर सदर अल्पवयीन मुलीला देत होता. दरम्यान गुरुवारी (२ जून) अल्पवयीन मुलगी व तिची आई सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घरात बसून होती. त्यावेळी सरफाज शेख रफिक मणियार, दानिश शेख रशीद मणियार, मोहसीन शेख मणियार, रशीद शेख रसूल मनियार, तोहिद शेख (पूर्ण नाव माहित नाही) व तन्वीर शेख शब्बीर आदी आले.
मारहाण करत असभ्य कृत्य
घरात घुसून अल्पवयीन मुलीसह तिच्या आईचा हात पकडून शिवीगाळ केली. मग मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून कपडे फाडले. शिवाय चापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आईच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वडील व भावालाही त्यांनी चापट बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बाहेर येऊन लोखंडी रॉडने दुचाकीची तोडफोड केली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात बाल लैंगिक संरक्षण कायद्याअंतर्गत कलम ८ व १२ प्रमाणे वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.
0 Comments