महिला नायब तहसीलदारावर कार्यालयातच कोयत्याने हल्ला; सख्ख्‍या भावाचे कृत्‍य

बीड : बीडच्या केजमध्ये महिला नायब तहसीलदारावर तहसील कार्यालयातचं कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला संपत्तीच्या वादातून सख्या भावानेच केल्याची माहिती समोर आली आहे.
केज तहसील कार्यालयात सदर घटना आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली. आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदाराचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत बसलेल्या असताना त्यांचा सख्खा भाऊ आला. त्याने गोंधळ घालत अचानक धारदार कोयत्याने हल्ला चढवला. यावेळी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला रूममध्ये कोंडून पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.

हल्‍लेखोर भाऊ ताब्‍यात

केज पोलिसांनी  हल्लेखोर भाऊ असणाऱ्या मधुकर वाघ यास ताब्यात घेतले असून कोयता जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हा प्रकार संपत्तीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e