जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, की किर्तनकार व्हायला काहीच अडचण नव्हती. माझा आवाजही चांगला आहे आणी मी त्या चार ओळी कधीही म्हणू शकतो; असे मतही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले
केंद्र सरकार अपयशी
काश्मीर पंडितांच्या मागे संपूर्ण देश आहे. जरी आज त्यांची हत्या होत असली तरी ही बाब अत्यंत निंदनीय आहे. याकरता केंद्र सरकारने कश्मिरी पंडितांच्या मागे उभे राहून त्यांना मदत करून प्रत्येक राज्याने देखील पंडितांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मात्र यात केंद्र सरकार अपयशी ठरले असून या सर्व अतिरेकी कारवाया असून यात प्रामुख्याने केंद्र सरकारचे लक्ष जास्त द्यावे अशी अपेक्षा आहे. यातूनच काहीतरी होऊ शकते; असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments