अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राजेंद्र बंबची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आझादनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ठगबाजीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतला आहे. यानंतर एकाच वेळी त्याच्याशी संबंधित पाच ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी महत्त्वाच्या कागदपत्रासह ऐवज ताब्यात घेतला. परिणामी न्यायालयाने यापूर्वी त्याला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.
पंधरा कोटींचा ऐवज
या काळात तपास यंत्रणेने त्याच्या विविध बँकांमधील खात्यांची चौकशी करीत त्याने दडवून ठेवलेला सुमारे पंधरा कोटींचा ऐवज शोधून काढला आहे. याप्रकरणी राजेंद्र बंब याच्याविरुद्ध आझादनगर पोलिसात नव्याने दोन गुन्हे तर शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. आज न्यायालयात हजर केल्यानंतर तपास यंत्रणेने त्याच्या कोठडीची मागणी केली आहे. गेल्या चार दिवसातील कारवाईची माहिती न्यायालयासमोर ठेवल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
0 Comments