यावल येथे पाचशे रूपयांची लाच; अव्‍वल कारकून ताब्‍यात

यावल (जळगाव) : येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून एम. एफ. तडवी यांस पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर घटना बुधवार (१५ जून) दुपारी साडेबाराला घडली.

यावल  तालुक्यातील मोहराळे येथील तक्रारदार यांचे वडिलांचे मोहराळे शिवारात शेतजमिन असुन त्या शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे सदर वाद-विवादाबाबत येथील तहसिलदार यांचेकडे दावा दाखल केला गेला होता. सदर दाखल केलेल्या दाव्यामधील तहसिलदार यांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे एम. एफ. तडवी यांनी पंचासमक्ष स्वतःसाठी ५०० रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम श्री. तडवी यांनी स्वतः पंचासमक्ष तहसिल कार्यालयात स्वीकारली म्हणून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दुसऱ्यांदा रंगेहाथ सापडले

अव्‍वल कारकून असलेले एम.एफ. तडवी यांची लाच स्वीकारण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी देखील त्यांनी लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. यानंतर आज पुन्‍हा पाचशे रूपयांची लाच घेताना सापडून आले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e