जळगाव येथे पतीने पत्नीला मारले जीवे; कारण ऐकून व्हाल थक्क

यावल (जळगाव) : जेवण वेळेवर मिळत नसल्याने व पत्नीकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीतून कौटुंबिक कलह निर्माण होत होता. याच संतापाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील थोरगव्हाण येथे घडली

थोरगव्हाण (ता. यावल) येथील इंदूबाई प्रकाश पाटील (वय ५८) ह्या पती प्रकाश पांडूरंग पाटील, विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह वास्तव्याला होत्या. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवार (ता.२७) मुलगा आनंद जळगाव येथे कामासाठी गेला होता. तर लहान मुलगा एका गल्लीत वेगळा राहतो. त्यामुळे घरात प्रकाश पाटील आणि पत्नी इंदूबाई पाटील हे दोन्ही एकटेच होते.

वादातुन डोक्यात मारला दंडा

रविवारी सायंकाळी पती ,पत्नी यांच्या कौटूबिक कारणावरून तीव्र वाद झाला. यात संतापाच्या भरात प्रकाश पाटील यांनी पत्नी इंदूबाई पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकला. यात इंदूबाई पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शेजारच्यानी तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

स्वतः पोलिसात जमा

संशयित पती प्रकाश पाटील याने खून केल्यानंतर स्वत:हून यावल पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला असून रात्री उशीरापर्यंत संशयित आरोपी पती प्रकाश पांडूरंग पाटील याच्या विरोधात जळगाव येथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मयत महिलेच्या पती, दोन मुले आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e