मुंबई: मुंबई सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली. नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नेहरू नगर परिसरात घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कोलकाता येथील मूळची रहिवासी आहे. ती दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आली होती. नोकरीच्या शोधात ही महिला मुंबईत आल्याची माहिती मिळते. तिचा मेहुणा तिला मुंबईत घेऊन आला होता. त्याने पीडितेला कुर्ला पूर्वेतील बर्मा सेल लाइन परिसरात झोपडीत राहणाऱ्या तिघांच्या हवाली केले होते. त्या बदल्यात त्याने पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची कोलकाताची आहे. मार्च महिन्यात ती मुंबईत आली होती. तिला तिचा मेहुणा मुंबईत घेऊन आला होता. ती नोकरीच्या शोधात या शहरात आली होती. मेहुण्याने तिला गोवंडीत आणले होते. त्यानंतर कुर्ला येथील बर्मा सेल लाइन परिसरातील झोपडीत राहणाऱ्या तिघांकडून त्याने पैसे घेतले आणि पीडितेला त्यांच्या ताब्यात दिले.
या तिघांनी पीडितेवर अत्याचार केले. या धक्कादायक प्रकाराने ती भेदरली. या घटनेबाबत तिने कोणालाही सांगितले नाही. तीन महिन्यांनंतर पीडितेने नेहरू नगर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपी मेहुणा तसेच इतर तिघा आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी चौघांनाही अटक केली. सर्व आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
0 Comments