कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट; पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव

दिल्ली : गेल्या महिनाभरापासून कच्चा तेलाच्या  किंमतीत सातत्याने वाढ होत होती. मात्र, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात .075 टक्क्यांनी वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. गुरूवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारत कच्चा तेलाची किंमत प्रतिबॅरेल 118 डॉलरवर आली आहे. दरम्यान, कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे  नवे दर जारी केले आहेत

गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती प्रतिबॅरेल 120 डॉलरच्या पार गेल्या होत्या. बुधवारी आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमती प्रतिबॅरेल 123 डॉलरवर पोहचली होती. मात्र, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात .075 टक्क्यांनी वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमती घसरण झाली. कच्चा तेलाच्या किमती 5 डॉलरने घसरून 118 डॉलरवर आली आहे.

दरम्यान, आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमत घसरली असली तरी, भारताच्या देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर त्याचा परिणाम झाला नाही. गुरूवारी सकाळी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केले. आज पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. नुकतेच सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली होती.

दरम्यान, गुरूवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e