या प्रकरणात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली त्यानुसार आज उपअधीक्षक नीलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल अंकुशकर, पोलीस निरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार विजय उपरे, तानाजी मुंडे, रुद्रा कबाडे, राजाराम फुपाटे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, विजय शुक्ला, हिम्मतराव सरनाईक यांच्या पथकाने सहाय्यक निबंधक कार्यालया समोर सापळा रचला होता. दरम्यान लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम वरिष्ठ लिपीक संजय पिसाळकर यांने घेतली. त्यावरून पोलिसांनी पिसाळकर याला ताब्यात घेतले असून सदर रक्कम मागणीमध्ये सहाय्यक निबंधक अभय कटके, कर्मचारी ए.जी. राठोड यांचा सहभाग असल्याने पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
0 Comments