यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्या डॉ. दीपा नाईक यांनी सांगितले, “धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच त्यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. यापूर्वी आम्ही पोलीस विभागाला वेळोवेळी सूचित केले आहे. असे असताना गुरुवारी रात्री पुन्हा आमदार फारुख शहा यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.”
“या गंभीर गोष्टीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ आमदार फारुक शाह यांची सुरक्षा वाढवावी. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांच्या घराजवळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा. तसेच रात्रीच्या वेळी त्यांच्या सुरक्षेत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात यावा,” अशा अनेक मागण्या एमआयएमच्या दीपा नाईक यांनी केल्या. याबाबत त्यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिले.
0 Comments