नावरेतील महिला ठार
नावरे ता.यावल येथील रिनाबाई सुनील मेढे वय ३९ या शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर गुरुवारी ता.२३ दुपारी वादळी पाऊस सुरू असताना अचानक वीज कोसळली. यात रीना गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्या नावरे ग्रामपंचायत सदस्य रेखा मेढे यांच्या भगिनी होत. विशेष म्हणजे, रीना मेढे यांच्या पतीचे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच एका अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नावरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माडवे येथे महिलेचा मृत्यू; एक जखमी
मांडवे बुद्रूक (ता.जामनेर) परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतात मका लावण्याचे कामासाठी गेलेल्या हुजराबाई नब्बास तडवी (वय ४०) या लिंबाच्या झाडाचा सहारा घेण्यासाठी गेल्या असता झाडासह अंगावर वीज कोसळल्याने हुजराबाई जागीच ठार झाल्या. तर जवळच असलेले सुपडू पुंडलिक जाधव (वय ६०) हे जखमी झाले. त्यांना जामनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, मृत हुजराबाई यांना दोन मुले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य मेहमूद तडवी, पोलिस पाटील सागर जाधव यांनी मृत महिलेवर जामनेर सरकारी दवाखान्यात विच्छेदन करण्यात आले.
0 Comments