सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; शेतीच्या वादातून त्याने चक्क मोठ्या भावाला संपवलं

नाशिक : नाशिक तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात टिकाव मारत त्याची हत्या केली. ही भयंकर घटना गुरूवारी जलालपूर शिवारात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लहान भावाला अटक केली असून अन्य चौघे संशयित पसार झाले आहेत. 
बळवंत कोंडाजी शेळके (वय ५७, रा. यशवंत नगर, मुंगसरा) असे मृत्यू झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. एकत्रित शेतीवरून बळवंत व त्यांचा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके (६०) यांच्यात वाद होते. गुरुवारी याच वादातून दोन्ही भावांमध्ये हाणामारी झाली. त्यात बळवंत यांच्यावर श्रीहरी यांच्यासह त्यांचा मुलगा जयदीप श्रीहरी शेळके (३५) यांनी हल्ला करीत टिकाव डोक्यात टाकला.
या घटनेत बळवंत यांना गंभीर जखम झाली. बळवंत यांना त्यांचा मुलगा अक्षय व भाऊ यशवंत शेळके यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी हल्लेखोर पुतण्या जयदीप यास ताब्यात घेतले असून श्रीहरी व त्यांची पत्नी हे जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e