कॅरीबॅगमध्‍ये सापडले सहा लाखाचे दागिने; पाचोरा रेल्‍वेस्‍थानक परिसरात होते पडून

पाचोरा जळगाव: पाचोरा रेल्वेस्थानक आवारात १३ तोळे वजनाचे ६ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सापडले. या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असून याची सखोल चौकशी होऊन  यातील सत्य बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.
रेल्वे  पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार १६ जूनला दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे कंत्राटी सफाई कामगार उषा गायकवाड या कचरा टाकण्यासाठी पीजे लोकोशेडच्या मागील बाजूस गेल्या. कचरा टाकून परत येत असताना त्यांना हिरव्या रंगाची कॅरीबॅग गाठ बांधलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी ती उचलून त्यांचे सुपरवायझर शरद पाटील यांना दाखवली. तर त्यात काही तरी वस्तू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे उषा गायकवाड व शरद पाटील हे आपल्या सहकारी महिला सफाई कामगारांसोबत रेल्वे फलाटावरील लोहमार्ग दूरक्षेत्र पोलिस चौकीत आले.

सुरवातीला वाटले बेन्‍टेक्‍सचे दागिने

हवालदार ईश्वर बोरुडे यांच्याकडे त्यांनी कॅरीबॅग सोपवली असता, त्यात पिवळ्या धातूचे काही दागिने आढळल्यानंतर ते बेन्टेक्सचे असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. याबाबत श्री. बोरुडे यांनी रितसर नोंद घेऊन वरिष्ठांना कळवून सोनाराकडे दागिण्यांची तपासणी केली असता, ते दागिणे सोन्याचे असल्याचे निष्पन्न झाले. १३ ग्रॅम वजनाच्या ६ लाख ६ हजार रुपये किमतीच्या दागिण्यांमध्ये सोन्याचा हार, चार बांगड्या, कानातील रिंगा, साखळीचे टॉप्स, चैन व पेंडल यांचा समावेश आहे. हे दागिणे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत रात्री उशिराने नोंद करून चाळीसगाव रेल्वे पोलिस मुख्यालयात दागिणे जमा केले आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e