अमळनेर : शिरूड (ता. अमळनेर) येथील एका महिलेने पाच वर्षांच्या मुलासह गळफास घेऊन जीवन संपविले. सदर घटना १७ जूनच्या मध्यरात्रीनंतर घडली असून आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
शिरूड येथील पूर्वी वसंतराव पाटील असे विवाहितेचे तर वृषांत दीपक पाटील उर्फ बिट्टू असे मुलाचे नाव आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी या महिलेचा विवाह झाला होता. परंतु सदर महिला काही वर्षांपासून शिरूड येथे माहेरी आपल्या आई– वडिलांसोबत राहत होती.
लिहून ठेवली सुसाईड नोट
महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये; आम्ही दोघे मायलेक जीवन संपवत आहोत. नंदुरबार येथील सासरच्या मंडळीला बोलावू नका; असेही चिट्ठीत लिहिले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
0 Comments