रेल्वे गेटजवळ डंपरची ॲपे रिक्षाला धडक; सहा प्रवासी गंभीर जखमी

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील श्रावणी रेल्वे गेटजवळ डोगेगावहुन प्रवासी भरून खांडबारा गावाच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षाला धडक दिली. यात रिक्षा पलटी झाल्‍याने रिक्षातील सहा प्रवाशी  गंभीर जखमी झाले आहेत 
खांडबाराकडे जात असलेलर रिक्षा (क्र. GJ 38 W 1548) श्रावणी रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने (क्र, GJ 16 X 8359) जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहतूक रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की याचा  आवाज दूरपर्यंत नागरिकांना ऐकू गेला. आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या प्रवासी वाहतूक रिक्षातून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने एका खासगी वाहनातून अपघातग्रस्त जखमी प्रवासीना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सहा प्रवाशी जखमी

अपघातात सुरेश संजय गावित, सविता अनिस वळवी (रा. जामदा), अमिरा दिनेश वळवी, भामटी अरविंद (रा. माऊलीपाडा), अनिस वळवी (रा. जामदा), रिक्षा चालक असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी विसरवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांडबारा ग्रामीण पोलीसांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e