डोंबिवलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे डोंबिवली हदरली असून सांस्कृतिक शहरात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डोंबिवली मधील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय 18 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या आयरेगावातील समतानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या या तरुणाने गुरुवारी दुपारी साडेबारा बाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशनसमोर धावत्या लोकल समोर येऊन आपली जीवनयात्रा संपवली
मोटरमनने रेल्वे स्टेशन प्रबंधकांना सदर घटनेची माहिती दिली. स्टेशन प्रबंधकांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती वपोनी मुकेश ढगे यांनी दिली. मात्र या तरुणाने आत्महत्या का केली हे आद्यप समजलेले नाही.
या घटनेपूर्वी बुधवारी कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान एका तरुणांचा मृत्यू झाला. डोंबिवली पूर्वकडील म्हात्रे नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने कोपर ते दिवा स्थानका दरम्यान लोकल समोर जाऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीचे देखील वय १८ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणीचे त्याच्या वडिलांसोबत भाडणं झाले होते. या रागातून त्याने आत्महत्या केल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
0 Comments