जावयाला पुरणपोळी बनवून न दिल्याने राग अनावर; सासूने सुनेच्या डोक्यात मारली पकड!

खुलताबाद : सासुरवाडीला आल्यावर जावयाचा वेगळाच थाट असतो. जावई आला म्हटलं तर सासुरवाडीची मंडळी त्याला आवडेल ते जेवण बनवतात, मानपान देतात. अशातच जावयाचा थाट पूर्ण न केल्याने सासूने चक्क सुनेच्या डोक्यात पकड मारल्याची घटना उघडकीस आली. औरंगाबाद  जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

जावई सासरी आल्यानंतर सुनेनं त्याला पुरणपोळी बनवली नाही म्हणून संतापलेल्या सासूने सुनेच्या डोक्यात पकडीने वार केला. या घटनेत सून गंभीर जखमी झाली. माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीची बाजारसावंगी ही सासूरवाडी आहे. काही कामानिमित्त तो सासूरवाडीला आला होता. बऱ्याच दिवसांनी जावई घरी आल्यानंतर सासूलाही आनंद झाला. तिने आपल्या सूनेला जावयासाठी पुरणपोळी बनवण्यास सांगितलं 

मात्र, सूनेनं पुरणपोळी बनवून देण्यास नकार दिला. मग काय याच गोष्टीवर सासूला राग अनावर झाला. आणि तिने थेट किचनमध्ये प्रवेश करत सूनेच्या डोक्यात पकडीने वार केला. या घटनेत सून गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी सासूवर खुलताबाद पोलिंसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e