यावल येथे मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ

यावल (जळगाव) : येथील माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेचा मुलगी झाली म्हणून छळ करीत कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. या पैशांची पूर्तता न केल्याने विवाहितेस माहेरी सोडून दिले म्हणून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील प्रणाली राहुल आमोदकर (वय २४) या विवाहितेने यावल  पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे लग्न ३० एप्रिल २०१८ ला राहुल नोमदास आमोदकर (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांच्यासोबत येथे झाले होते.  लग्नानंतर विवाहिता रहिमतपूर येथे नांदण्यास गेली व १४ जुलै २०१९ ला तिला मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून तिचा पती व सासरच्या लोकांकडून छळ होऊ लागला. तसेच छोट्या छोट्या कारणावरून पतीकडून शिवीगाळ, मारहाण होऊ लागली. तसेच तिला पती व सासरच्या मंडळींनी वाहन कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे, म्हणून तिला त्रास द्यायला सुरवात केली.

सासरच्‍यांवर गुन्‍हा

पैसे न दिल्याने विवाहितेला माहेरी यावल येथे सोडून दिले. या प्रकरणी विवाहितेचा पती राहुल आमोदकर, सासरे नोमदास नथ्थू आमोदकर, सासू नलिनी नोमदास आमोदकर, जेठ विकास नोमदास आमोदकरी व इंताजबाई शौकत सय्यद अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान दिलावरखान, नितीन चव्हाण, हवालदार बालक बाऱ्हे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e