मिळालेल्या माहितीनुसार, 3 महिन्यांपूर्वी तळपाडा येथील तरुण विजय भास्कर महाले याचे भारती थवील नामक तरुणीसोबत कोर्ट मॅरेज झाले. दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. दरम्यान ही माहिती थवील कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी त्यावेळी त्यांनी विजय याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. त्यावेळी कायद्याप्रमाणे लग्न झाले असे सांगत पोलिसांनी थवील कुटुंबीयांना ताकीद दिली होती.
मात्र मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग थवील कुटुंबीयांच्या मनात होता. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतीचे काका दिनकर प्रभाकर थवील, वडील रघुनाथ प्रभाकर थवील, भाऊ राहुल रघुनाथ थवील आणि बनपाडा गारमाळ गावातील तब्बल ५० ते ६० लोकांना घेऊन तळपाडा येथे आले. यात विजय, भारती, भास्कर महाले, हिराबाई महाले हे चौघे झोपेत असताना त्यांच्यावर शस्त्रहल्ला केला.
इतकंच नाही तर, त्यांनी भारतीच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. आरडाओरडा झाल्यानंतर मदतीला आलेल्या ग्रामस्थांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. महाले कुटुंबीयांचा मोबाईल आणि घरातील साहित्य चोरून नेले. या घटनेची माहिती सुरगाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कोळी यांना तत्काळ देण्यात आली. मात्र, त्यांनाही येण्यास उशीर झाला. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं.
0 Comments