पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेविषयी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहा वाजेच्या सुमारास आहेर इंडस्ट्रीबाहेर नंदकुमार निवृत्ती आहेर (वय ५०) यांच्यावर चौघानी हल्ला केला. डोक्यावर आणि पोटावर आहेर यांच्यावर हल्ला झाला. यावेळी संशयितापैकी एकाच्या पायावर चॉपरचा कट लागल्याने जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
या संशयिताच्या पायाला चॉपरची जखम झाल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्ताच्या धारेवरून पोलिसांनी संशय आला आणि त्यांनी सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चारही आरोपी अठरा ते वीस वर्षांचे आहेत. एकाच्या आईला त्रास दिला गेला, यामुळे नोकरी गेली. या रागातून एकत्र येत चौघांनी हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments