सावंदे येथे संतोष हा त्याची पत्नी कविता हिच्यासोबत राहत होता. कविता हिचे नातेवाईक वारंवार संतोषच्या घरी वास्तव्यास येत असत. याचा राग संतोषला येत होता. मंगळवारी दुपारी १२ वाजता याच कारणावरून संतोष आणि कवितामध्ये वाद झाला होता. या वादातून त्याने घरातील लाकडी दांडक्याने तिला मारहाण केली. या मारहाणीत कविताचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याने घराजवळील एका पडवीत तिचा मृतदेह नेऊन जाळला. घटनेची माहिती स्थानिकांनी भिवंडी तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने संतोषला अटक केली. संतोषला दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
0 Comments