दुकानांमध्ये चोरीबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता, या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाची चक्रे फिरवली असता दोंडाईचा येथील एका सराईताने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली असल्याचे उघडकीस आले. या अनुषंगाने संबंधिताच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या असता त्याने हि चोरी आपल्या साथीदारांच्या मदतीने केली असल्याची कबुली दिली आहे. इलेक्ट्रॉनिक दुकानातील वायरचे बंडल तांब्याची तार विकण्याच्या हेतूने चोरी करून एका भंगारवाल्याला ते विकले असल्याची देखील कबुली दिली आहे.
तो दुकानदार देखील ताब्यात
यापूर्वी देखील अशाच प्रकारे चोरी केलेले वायरचे बंडल चोरी करून संबंधित भंगारवाल्याला विकले असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्यानंतर संबंधित चोरीची वायर विकत घेणाऱ्या भंगार दुकानदाराच्या देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या दरम्यान चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईदरम्यान दोघांच्या मुसक्या देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या आहेत. तसेच संबंधितांचे आणखी तीन साथीदार फरार असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या फरार तिघा आरोपींचा शोध घेतला जात आहे.
0 Comments