नंदुरबारमध्ये तरुणाचा मुळशी पॅटर्न; 'बर्थडे बॉय' तलवारीसह पोलिसांच्या ताब्यात

नंदुरबार : नंदुरबारमध्ये तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तरुणाचा केक कापण्याचा व्हिडीओ नंदुरबार विभागात चांगलाच व्हायरल झाला. मात्र, हा व्हिडीओ नंदुरबार पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी संशयितास तलवारीसह दुसऱ्यादिवशी ताब्यात घेतले. त्यानंतर संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाशा गावात अजय गावीत या तरुणाचा वाढदिवस होता. या वाढदिवसासाठी त्याने जय्यत तयारी केली. या वाढदिवसात त्याने तलवारीने केक कापला . तलवारीने केक कापल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हाती लागले. त्यानंतर पोलिसांनी अजय गावीत यास ताब्यात घेतले. पोलिसांच्या पथकाने अजय गावीत याला प्रकाशा गावातील मुंजळा हट्टी येथून घरी जाऊन ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांच्या पथकाने चौकशी केली असता तलवारीने केक कापल्याची कबुली दिली. तसेच जवळील तलवार पोलिसांना काढून दिली. त्याच्या या कृत्याने त्याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियात तलवारीने केक कापल्याची चर्चा रंगली होती.

भंडाऱ्यात टिप्परने मोटारसायकल चालकास चिरडले

भंडाऱ्या जिल्ह्यात भरधाव वाळू तस्करी करणाऱ्या टिप्परने मोटारसायकल चिरडल्याची घटना घडली आहे.भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली आहे. जखमीला भंडारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. श्रीकृष्ण जांभूळकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e