राष्ट्रवादीने हवेत सोडले काळे फुगे; अग्निपथ योजनेविरोधात धुळ्यात आंदोलन

धुळे : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ या योजनेला बहुतांश ठिकाणाहून विरोध केला जात आहे. यात धुळ्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने केंद्र सरकारच्या या योजनेचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे 

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या या योजने विरोधात धुळ्यात आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र सरकारतर्फे बेरोजगार तरुणांची थट्टा केली जात असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांतर्फे लावण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही; तर धुळ्यातील माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

काळे फुगे सोडून निषेध

आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाल्याचे बघावयास मिळाले. तसेच या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून तसेच हवेत काळ्या रंगाचे फुगे सोडून आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e