चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसाठी घोडेगाव येथून विवाहासाठी स्थळ आला. सदर गोष्ट वर्षभर चालली. मात्र सदर स्थळ मुलीच्या वडिलाला आवडला नाही. म्हणून त्यांनी समोरच्या भावी वराला वारंवार नकार दिला. याचाच राग आल्याने भावी वरासह एकाने माझ्या मुलीला पळवून नेले असावे असा संशय आहे.
दोघांवर गुन्हा दाखल
पीडितेच्या वडिलांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानक गाठून संशयित आरोपी जगन परशराम राठोड व मनेश धनराज राठोड (दोन्ही रा. घोडेगाव ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.
0 Comments