दिवसा पाणीपुरी विक्री; रात्री वाहनांची चोरी

जळगाव : शहरातील एका पाणीपुरी विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिवसा पाणीपुरी विक्रीची गाडी लावणारा हा भामटा रात्री वेगवेगळ्या परिसरातून वाहने लंपास करीत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून  असंख्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे 
शहरात दिवसाला तीन दुचाी चोरी होत असल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली होती. प्रत्येक गुन्हेगारावर पाळत ठेवूनही चोरटे सापडत नसल्याने अखेर गुप्त बातमीदार पेरून माहिती घेण्यात आली. दिवसा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एकावर संशय असल्याने काही दिवस त्याच्यावर खबऱ्याने पाळत ठेवली. संशयास्पद हालचाली आढळून आल्याने गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, राजेश मेंढे, संजय हिवरकर, संतोष मायकल, ईश्वर पाटील, हेमंत पाटील यांच्या पथकाने पाणीपुरी विक्रेता मनीष ऊर्फ मायाराम जनरलसिंग यादव (मूळ रा. ग्वालियर, ह. मु. जळगाव) याला पाणीपुरी विकता असताना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यात शहर पोलिस ठाणे, जिल्‍हापेठ आदी हद्दीतून चार दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून वाहने जप्त करण्यात आली आहेत.

दिवसा पाणीपुरी अन्

अटकेतील मनीष ऊर्फ मायाराम यादव हा दुपारी पाणीपुरी विक्रीची गाडी लावतो. तत्पूर्वी सकाळी आणि रात्री दहानंतर तो शहरातील विविध भागातून दुचाकी चोरून पळ काढत होता. त्याच्याविरुद्ध ग्वालियर येथेही असंख्य गुन्हे दाखल असून, तो तेथील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e