धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन संबंधित मालकास त्यांचे तब्बल पंचवीस वर्षापूर्वी चोरी गेलेले 26 ग्रॅम सोने परत केले आहे. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली आहे.
मालकाला सुखद धक्का
दरोड्यात चोरी गेलेले सोने किंवा रोख रक्कम परत मिळणे कठीणच असते. यात तब्बल पंचवीस वर्षांपुर्वी चोरीला गेलेले सोने परत मिळेल अशी आशाच नव्हती. मात्र पोलिसांकडून याबाबत माहिती मिळाल्याने मालकास सुखद धक्काच बसला. त्यावेळी असलेले सोन्याचे दर व आता असलेल्या सोन्याच्या दरातील तफावत मोठी आहे. यामुळे पोलिसांकडून सोने घेताना मालकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
0 Comments