मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १२०० किलो मांस जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेला मांस गोमांस आहे की अन्य कोणत्या प्राण्याचे आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी सिराज कुरेशी,अन्वर कुरेशी आणि अब्दुल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत तीन व्यक्तींकडे प्राण्यांचा १२०० किलो मांस सापडल्याने खळबळ माजली आहे. जप्त केलेले मांस गोमांस असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राण्यांचे मांस ठेवणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे गोमांस आहे की, अन्य कोणत्या प्राण्याचे मांस आहे, यासाठी पोलिसांनी नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत. काही इसम प्राणी कापून त्यांचे मांस ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्ळळी धाव घेत तीन आरोपींना अटक केली.
0 Comments