जळगावातील देवेंद्रनगरात उमेश राजेंद्रप्रसाद चौरसिया (वय 37) हा वास्तव्यास आहे. फेब्रुवारी ते डिसेंबर 2020 या दरम्यान छिंदवाडा येथील शिवशंकर लखन जवरकर व नीतू शिवशंकर जवरकर या दाम्पत्याने उमेश चौरसिया यांच्यासोबत संपर्क साधला. उमेश याचा विश्वास संपादन करून त्याला छिंदवाडा येथील मेडिकल कॉलेजला अकाउंटंट म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. उमेशला विश्वास बसावा म्हणून नोकरी लागल्या बाबतचे बनावट पत्र तयार करून दोघांनी उमेशच्या मोबाईलवर पाठवले व त्यानुसार पैशांची मागणी केली. अशा पद्धतीने दोघांनी उमेश याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले.
दोन वर्षानंतर पोलिसात तक्रार
पैसे देऊनही प्रत्यक्षात नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर उमेश चौरसिया याने तब्बल दोन वर्षानंतर बुधवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनुसार शिवशंकर जवरकर व नीतु जवरकर या दाम्पत्य विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.
0 Comments