मिळालेल्या माहितीनुसार, शेख जावेद यांनी ते राहत असलेल्या भागात राहणाऱ्या जावेद पठाण याला घरगुती गॅसची टाकी दिली होती.पठाणला दिलेली गॅसची टाकी परत आणण्यासाठी शेख जावेद त्याचा घरी गेले. त्यावेळी जावेद पठाण याने गॅसची टाकी आता नाही तुला नंतर देतो, एकदा सांगितले तर समजत नाही का, असे म्हणत वाद घातला व शिवीगाळ केली. वादाचे रुपांतर कडाक्याच्या हाणामारीत झाले. त्यावेळी जावेद पठाण याने शेख जावेद यांच्या गळा, डोक्यावर गंभीर वार केले. त्यामध्ये शेख जावेद यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी परभणीच्या शासकीय रुग्णालय पाठवण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी जावेद पठाण अद्याप फरार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपीला शोधण्यासाठी २ स्पेशल पथक तयार केले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहेत. दरम्यान, भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी जावेद पठाण याला त्वरित अटक करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
0 Comments