अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धडगाव संचलित देवमोगरा पुनर्वसन (मांडवा) अनुदानित आश्रम शाळेच्या इमारतीचे पत्रे उडून लाखोंचे नुकसान झाले.
सहाशे विद्यार्थी घेतात शिक्षण
देवमोगरा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा असून सुमारे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु काल आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अधिक्षक गृह, कोठी गृह व प्राथमिक व माध्यमिक वर्ग भरत असलेल्या इमारतीचे पत्रे उडाली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. शासन व प्रशासनाने त्वरीत लक्ष्य देऊन इमारत दुरुस्ती करावी जेणेकरून चालू शैक्षणिक हंगामात वर्ग भरण्यास सोयीस्कर होईल अशी मागणी होत आहे.
0 Comments