धुळे : मान्सुनचे आगमन होत असताना अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा बसत आहे. शनिवारी देखील जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात मोठे नुकसान झाले आहे. वीज पडून जनावरे दगावली असून, वाऱ्यामुळे विद्युत पोल पडले आहेत. तसेच विद्युत डिपी पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
साक्री तालुक्यात शनिवारी संध्याकाळी मुसळधार व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय वीज पडून दोन गाई व एका वासराचा तसेच दोन बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वाऱ्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युतपोल जमीनदोस्त झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत
पंचनामा सुरू
वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे पशु पालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे यासंदर्भात पंचनामा करण्यात येत आहे.
0 Comments