शिरपूर येथे डंपरची दुचाकीला धडक; वडीलांचा मृत्‍यू, मुलगी जखमी

शिरपूर (धुळे) : भरधाव डंपरखाली चिरडल्याने तरुण ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात वाडी बुद्रुक (ता. शिरपूर) गावाजवळ घडला. मृत व जखमी बापलेक असून, शेवाळे (ता. साक्री) येथील रहिवासी आहेत. नातलगांना भेटण्यासाठी जात असताना, हा अपघात झाल्याचे समजते. 
शेवाळी येथील सागर भीमराव कोळी (वय ३२) यांच्या चुलत शालकाचा विवाह १२ जूनला वाल्मिकनगरमध्ये होता. तेथे हजर राहण्यासाठी ते मुलगी दिव्या (वय १४) हिच्यासह दुचाकीने आले होते. लग्न आटोपून दुपारी साडेचारला ते वाडी खुर्द येथे नातलगांना भेटण्यासाठी जात होते. वाडी बुद्रुक येथील वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली. दोघेही रस्त्यावर पडले.

मुलीवर उपचार सुरू

डंपरखाली चिरडून सागर कोळी जागीच ठार झाले. दिव्या गंभीर जखमी झाली. तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून धुळ्याला हलविले आहे. अपघातानंतर डंपरही उलटला. सागर कोळी खासगी वाहनावर चालक होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण, मुलगी व मुलगा आहे. शहर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e