युवती सेनेच्यावतीने आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. देशाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला शेतीची काम ऊरकताना आपल्या पायांचे संरक्षण या बुटांच्या माध्यमातून आता करता येणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतर्फे समाधान व्यक्त करण्यात आले आहे. यावेळी युवती सेनेच्या वतीने पदाधिकारी प्रियंका जोशी यांच्यासह इतर युती सेनेच्या कार्यकर्त्या उपस्थित असल्याचे बघायला मिळाले आहे.
0 Comments