मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना

जळगाव : जिल्‍ह्यातील मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज पहाटे मुक्ताईनगर येथील घरी आले होते. फोन आल्यामुळे ते तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती त्यांच्या पत्‍नी यामिनी पाटील यांनी दिली आहे 
महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. एका एका आमदारांच्या मताला खूप मोठी        किंमत  मानली जात आहे. आज  मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील  विधान परिषदेचे निवडणूक संपल्यानंतर मुलाची तब्येत बिघडल्यामुळे पहाटे घरी आले होते. घरी आल्‍यानंतर काही तासच थांबले. त्यानंतर त्यांना फोन आल्यामुळे पुन्हा ते तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले. असल्याची माहिती त्यांच्या पत्‍नी यांनी यामिनी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e