सांगवी गावाकडून महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असतांना पठाण जमरे (वय 45, रा.वडगाव जि. बडवानी, याला कंटेनरने धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थ महामार्गावर जमले. त्यांनी महामार्गाच्या दुतर्फा रास्ता रोको करुन वाहतूक रोखून धरली. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट घटनास्थळी पोहचले. त्यांनी समजूत घातल्यानंतर एका बाजूची वाहतूक ग्रामस्थांनी खुली केली.
गतिरोधक टाकल्यानंतर आंदोलन मागे
महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला असून मोठे गतिरोधक टाकल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही; असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी धुळे- पळासनेर टोलवे लि.च्या अधिकार्यांशी तातडीने संपर्क साधला. काही वेळानंतर कंपनीतर्फे साहित्याने भरलेली वाहने महामार्गावर दाखल झाली. गतिरोधक टाकल्यानंतर जमाव गावात परतला.
0 Comments