धक्कादायक! मराठवाड्यात दिवसाला 16 जण होतायत बेपत्ता; सहा महिन्यांत 1700 महिला मिसिंग

राज्यात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली असून, मराठवाड्यात दिवसाला 16 जण बेपत्ता होत असल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीतून समोर आले आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून गेल्या सहा महिन्यात तब्बल 3 हजार 211 जण बेपत्ता झाले आहे. ज्यात सर्वाधिक 1 हजार 21 महिला-पुरुष औरंगाबाद जिल्ह्यातून बेपत्ता झाली आहेत. मागील सहा महिन्यात मराठवाड्यातील 1700 महिला आणि 1400 पुरुष बेपत्ता झाले आहे. त्यातील अनेकांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती बेपत्ता...(आकडेवारी गेल्या सहा महिन्याची आहे
जिल्हा पुरुष महिला एकूण बेपत्ता 
बीड 103179282
जालना 188239427
औरंगाबाद494271021
हिंगोली8298180
परभणी  93111204
लातूर 16434398
उस्मानाबाद 104159263
नांदेड 21620436
एकूण 144417673211

जालना पोलिसांची उत्तम कामगीरी...

मिसिंग गुन्ह्यातील बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात जालना पोलिसांची उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यात जालना जिल्ह्यातून 427 जण बेपत्ता झाले आहे. त्यातील 354 जणांना शोधून काढण्यास जालना पोलिसांना यश आले आहे. 

सर्वाधिक बेपत्ता झाल्याची नोंद औरंगाबादेत...

मराठवाड्यात सर्वाधिक बेपत्ता झाल्याची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात असून,गेल्या सहा महिन्यात 1 हजार 21 जण मिसिंग आहेत. ज्यात 494 पुरुष तर 27 महिलांचा समावेश आहे. तर औरंगाबादच्या वाळूज, चिखलठाणा,शेंद्रा, चित्तेगाव आणि पैठण एमआयडीसी भागातून बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त आहे. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e