वर्षी कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने वारीला परवानगी दिली होती. त्यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह दुणावला होता. यावर्षी विदेशातील वारकरी देखील पंढरीला आले आहेत. आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली आहे. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा चार पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यंदा मानाचा वारकरी म्हणून मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला.
नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्यातील रुई गावचे रहिवासी आहेत. गेल्या मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या गेल्या वीस वर्षापासून पायी आषाढी वारी करतात. हे दाम्पत्य संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सोबत पंढरपूरला पायी आले आहेत. यंदा मंदिर प्रशासनाने आषाढी एकादशीसाठी जय्यत तयारी केली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली, रुक्मिणी पालखी, संत एकनाथ महाराज, संत सोपनकाका, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आदी या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.
0 Comments