अधिकाऱ्याने काही छायाचित्र पाठविल्यानंतर आरोपी अमितने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्याशी संपर्क साधला. तुमची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफीत आमच्याकडे असून ती तुमच्या नातेवाइकांमध्ये व्हायरल करू अशी धमकी दिली. ती व्हायरल न करण्यासाठी एक कोटीची खंडणी मागितली. एवढी मोठी रक्कम देण्यास संबंधित अधिकाऱ्याने असमर्थता दर्शविली. त्यानंतर अमितने 70 लाखांची मागणी केली. त्यापैकी पहिल्या हप्त्यात 28 लाख रुपये द्या, यावेळी तुम्हाला छायाचित्रे आणि चित्रफित देऊ असे अमित म्हणाला.
अधिकाऱ्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. अमितेशकुमार यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हेशाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नागपूरच्या सदर परिसरातील मधील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. त्यानंतर 28 लाखांची रोख रक्कम घेताना पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली आहे.
0 Comments