तलवार, चाकू बाळगून असलेला तरुण पोलिसांच्‍या ताब्‍यात

 धुळे : दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोबत तलवार व चाकू बाळगणाऱ्या 26 वर्षीय तरुणाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे असलेली नऊ इंच तलवार व चाकू देखील  पोलिसांनी हस्तगत केले आहे

साक्री तालुक्यातील दुसाने येथे राहणारा 26 वर्षे तरुण हा आपल्याकडे दहशत माजविण्याच्या हेतूने तलवार व चाकू बाळगून असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या  आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित तरुणाच्या घरी छापा टाकला. या छापा दरम्यान संबंधित तरुण पोलिसांना आढळून आला. तात्काळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडे असलेले चाकू व तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. या संदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व चौकशी निजामपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत आहे.

Dhule News

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e