देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडीया सप्ताहअंतर्गत 4 जूलैला झालेल्या डिजिटल इंडीया सप्ताहाचा गांधीनगर येथे शुभारंभ केला. या कार्यक्रमात पंतप्रधान केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी संदर्भात देशातील निवडक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला. यात उत्तर महाराष्ट्रातून धुळे जिल्ह्यातील बाम्हणे (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी शालिकराव वामन पाटील यांची निवड झाली होती. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालिकराव पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालिकराव पाटील यांच्याकडून सामान्य सेवा केंद्रातून देश पातळीवर शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. याचा लाभ कशा पद्धतीने मिळाला याची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली आहे.
0 Comments