साक्री तालुक्यातील खरटी या गावामध्ये असलेल्या अंगणवाडीतील शिक्षिका येतच नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी लावला आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी प्रशासनातर्फे दिला जाणारा पोषण आहार देखील प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या आहारापेक्षा खूपच कमी प्रमाणात दिला जात असून अंगणवाडी शिक्षकांतर्फे यामध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे लावण्यात आला आहे.
पंधरा– वीस मिनिटांकरीताच भरते अंगणवाडी
शासनाच्या नियमानुसार सुट्टीचा वार वगळता इतर दिवशी दररोज अंगणवाडी भरवणे आवश्यक आहे. मात्र अंगणवाडी शिक्षकांतर्फे मनमानी कारभार सुरू ठेवत महिन्यातून एकदाच अंगणवाडी भरविली जात असते. त्यातही ज्या दिवशी अंगणवाडीचे वर्ग भरविले जातात; तेव्हा 15 ते 20 मिनिटांच्या वरती हे वर्ग सुरू ठेवले जात नसल्याचे ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले आहे. या विरोधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली असून याबाबत संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत या अंगणवाडी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.
0 Comments