नंदुरबार: नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सध्या मुक्त विद्यापीठाचे पेपर सुरू आहेत. आज शेवटचा पेपर दिल्यानंतर नंदुरबार शहरातील आठ विद्यार्थी विरचक धरणात पोहायला गेले होते.
ते पोहायला गेलेल्या धरणात गाळ मोठ्या प्रमाणावर असल्याने गाळात पाय अडकल्यामुळे राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेला एक विद्यार्थी पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.
घटनेची माहिती मिळताच परिवार व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत राहुल आणि कल्पेश यांना उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केलं.
या घटनेमुळे मृतांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत विद्यार्थी जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत होते. आज शेवटचा पेपर देऊन पोहण्यासाठी गेले असताना आठ पैकी दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
0 Comments